प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ८ कोटी ३७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर
उदगीर : जळकोट मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मतदारसंघात चार प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन ग्रामीण रुग्णालये मंजूर करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे काम आ.बनसोडे यांनी केले असुन या रुग्णालयाचा लाभ या भागातील नागरिकांना होणार आहे.
त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य सुदृढ राहील यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून घेवुन त्यातच शासनाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी राष्ट्रीय आरोग्य विभागाअंतर्गत जळकोट तालुक्यातील घोणशी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कर्मचारी निवासस्थान व इतर बांधकामासाठी ६ कोटी २२ लक्ष रुपये तर देवर्जन ता.उदगीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रसाठी २ कोटी १५ लक्ष रुपये असे उदगीर व जळकोट तालुक्यातील कर्मचारी निवासस्थान व इतर बांधकामासाठी ८ कोटी ३७ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोईसाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल आ.संजय बनसोडे यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments