Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा : माजी मंत्री आमदार संजय बनसोडे

राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवा : माजी मंत्री आमदार संजय बनसोडे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे आनावरण 

उदगीर : महाराष्ट्र ही संताची, शूरविरांची, क्रांतिकारकांची व महान समाजसुधारकांची भूमी आहे. या थोरांच्या पवित्र पावलांनी या 
महाराष्ट्राची माती पावन झालीच पण या कर्तबगार थोर नेत्यामुळे या महाराष्ट्राचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले. जेव्हा जेव्हा या समाजामध्ये अन्याय अत्याचार व धर्म वाढतो तेव्हा त्यास संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते ती शक्ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होय, त्यांनी सत्तेचा मंत्र वापरून विकासाचे तंत्र या हिंदुस्तानाच्या मातीत राबविले . 'चूल आणि मूल'  या समाज व्यवस्थेला झुगारून एका हातामध्ये शस्त्र व दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेवुन २९ वर्ष त्यांनी राज्य कारभार केला अशा आदर्श राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवुन समाजाने आदर्श पिढी घडवावी असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी केले.

ते उदगीर येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरणाप्रसंगी उद्धाटक म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ समाजसेवक मोहनराव खिंडीवाले गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश्वर निटुरे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे, माजी नगरध्यक्षा उषा कांबळे, वर्षा कांबळे, उपसभापती प्रीती भोसले, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजी मुळे, विधानसभा अध्यक्ष प्रा.प्रविण भोळे, शहराध्यक्ष समीर शेख, माजी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश खटके, माजी उपसभापती रामराव बिरादार, बाजार समितीचे संचालक प्रा.श्याम डावळे, रा.काँ.चे उदगीर युवक अध्यक्ष रोहिदास कुंडगीर, बालाजी देमगुंडे, धनाजी मुळे, दिपाली औटे, ज्योती स्वामी, दत्ता सुरनर,श्रीहरी पाटील, उदय मुंडकर, विष्णु कावळे, गुंडेराव बनसोडे, भिंगोले गुरुजी, नारायण पाटील, वत्सलाबाई देमगुंडे, ईश्वर खटके, विलास नरवटे, क्षितीज शिंदे, उर्मिला वाघमारे, अमित पाटील, प्रकाश हैबतपुरे, बालाजी देवकते, व्यंकटराव पाटील, जितेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, मला उदगीरचे वैभव वाढवायचे होते म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारला व त्याचे अनावरण आज आपण करत आहोत. मी सामान्य कार्यकर्ता असुन मी एखादा शब्द दिला तर तो पाळणारा कार्यकार्ता आहे. नगर परिषदेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्याचा ठराव घेतला होता मात्र मला पुर्णाकृती पुतळा उभारायचा होता म्हणून लाखो रुपयाचा निधी मंजूर करुन सदर पुतळा उभारला.
 महिला शिकली म्हणून राज्यकर्ती झाली ही प्रेरणा आपल्याला आहिल्यादेवी होळकर यांच्यापासून मिळत आहे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. राज्यात धनगर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असुन या समाजाच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी 
सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगून 
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण समितीने उत्कृष्ट काम केल्याने हा देखणा सोहळा आज संपन्न होत आहे. माझ्या कार्यकाळात सर्व समाजाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला असल्याचे ही आ.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी समाज बांधवांच्या वतीने धनगर सोसायटी , साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक , छ.शिवाजी महाराज चौक ते अहिल्यादेवी गार्डन पर्यंत भव्य रॅली व मिरवणूक ढोल तासांच्या गजरात काढण्यात आली. याप्रसंगी आमदार संजय बनसोडे यांचा छ.शिवाजी महाराज चौकात क्रेनने पुष्पहार घालुन, फटाक्यांची आतिषबाजी करुन भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. प्रदीप ढगे, प्रीती दुरुगकर यांनी केले तर आभार प्रताप कुंडगिर यांनी मानले.

यावेळी शिवाजीराव शिंदे, शेषराव इंचुरे , प्रवीण इंगोले, शिवाजी बफछडे, डॉ.हनुमंत खिंडीवाले, प्रा. दिलीप चौधरी, तेजराव खटके, शेषराव भाकसखेडे, डॉ. श्रीगिरे, बालाजी परकड, पांडुरंग उदगिरे, ज्ञानोबा भाकसखेडे, बसवराज बदनाळे, लक्ष्मण कुंडगीर, वैजनाथ केसगिरे, रावसाहेब पाटील, रामराव पाटील, व्यंकट झुंडगिरी, रामेश्वर सलगरे, दामोदर उदगीरे , शेषराव सूर्यवंशी, नरसिंग जाणते , कल्याण पाटील, पिराजी बालूरे,धुळप्‍पा मालचापुरे, रोहिदास मदनुरे यांच्यासह उदगीर - जळकोट तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात