Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मल्लापूर व कौळखेड हातभट्टी दारू मुक्तीसाठी दत्तक घेणार, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक रमेश चाटे यांनी दिली पूर्व नियोजित भेट

मल्लापूर व कौळखेड हातभट्टी दारू मुक्तीसाठी दत्तक घेणार, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक रमेश चाटे यांनी दिली पूर्व नियोजित भेट


उदगीर:राज्य उत्पादन शुल्कच्या नांदेड विभागाच्या उपायुक्त उषा वर्मा यांनी दिलेल्या सूचनेनुसार व राज्य उत्पादन शुल्कचे लातूर जिल्ह्याचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर विभागाचे राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक रमेश चाटे.एस.पी काळे.गणेश गोले..निलेश गुणाले .संतोष केंद्रे .शंकर बागेलवाड.यांनी उदगीर तालुक्यातील मल्लापूर व कौळखेड हे गावं हातभट्टी दारू मुक्त करून दत्तक घेण्यासाठी ७ जून रोजी पूर्व नियोजित भेट दिली,व गावातील सरपंच,उपसरपंच,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष व नागरिक यांच्या सोबत चर्चा करून.हातभट्टी दारू मुक्त गावं दत्तक घेण्यासाठी पूर्व नियोजित लेखी स्वरूपात निरीक्षक रमेश चाटे यांनी तंटा मुक्ती अध्यक्षाला पत्र दिले,हातभट्टी दारु मुळे शासनाचा मोठया प्रमाणात महसूल बुडत असून हातभट्टी दारूमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.म्हणून आपले गाव हातभट्टी दारू मुक्त करून दत्तक घेण्यासाठी ग्रामपंचायतीने तीन ते चार दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावातील नागरिकांची बैठक बोलवावी जेणे करून हातभट्टी दारू मुक्त करून मल्लापूर व कौळखेड हे गावं दत्तक घेता येईल.असे पत्र राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक रमेश चाटे यांनी मल्लापुरचे तंटा मुक्ती अध्यक्ष व कौळखेडच्या तंटा मुक्ती अध्यक्षाना दिले.

Post a Comment

0 Comments

जाहिरात