सतीश चंदे यांना राजा भगीरथ पुरस्काराने सन्मानित
पंढरपूर: येथे राजा भगीरथ चार्टबल ट्रस्ट च्या वतीने स्नेह मेळावा भगीरथ गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये लातूर जिल्ह्यातील
वडवळ गावचे सुपुत्र पत्रकार सतीश चंदे यांना राजा भगीरथ पुरस्कार देण्यात आला पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे आपल्या पत्रकारिताच्या माध्यमातून अन्याय ला वाचा फोडण्याचे काम केले आहे वस्ती तांडे व शेतकऱ्यांचे प्रश्नावर आवाज उठवून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना भगीरथ राजा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे एडवोकेट दिलीप सगर, प्राध्यापक डॉ. पी.एन सगर लातूर, जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आशोक चंदपाटले, सूर्यभान आयनिले, जयश्री सगर, सिद्धाराम सगर, सिद्राम आचमवर देविदास राजापुरे, रवींद्र सगर, भगीरथ नामा, वृत्तपत्र समूह चे दीपक सगर, सनातन प्रभात चे पत्रकार संतोष कोल्हापुरे व दत्तात्रेय गजलवार इत्यादी प्रमुख उपस्थित होते
0 Comments