Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

डोंगरशेळकी तांडा येथे हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर छापे,1 लाख 5 हजाराचा मुद्देमाल नष्ट,04 गुन्हे दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

डोंगरशेळकी तांडा येथे हातभट्टी दारू तयार करणाऱ्या ठिकाणावर छापे,1 लाख 5 हजाराचा मुद्देमाल नष्ट,04 गुन्हे दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

लातूर:गणपती उत्सवाच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात अवैध रीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे ,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने उदगीर उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये डोंगर शेळकी तांडा येथे अवैधरित्या हातभट्टी दारू तयार करणाऱ्या  इसमावर  दिनांक 24/09/2023 रोजी सकाळी छापामारी केली. यामध्ये 1750 लिटर रसायन ,साहित्य, हातभट्टीची दारू असा एकूण किंमत 1 लाख 5  हजार रुपयेचे रसायन,हातभट्टी दारू आणि हातभट्टी निर्मिती चे साहित्य नष्ट करण्यात आले आहे. या कारवाईत
1) संतोष रतन पवार 
2)चंद्रकांत ठाकूर राठोड
3) दिलीप देवराव पवार
 4)लक्ष्मण भीमराव पवार, सर्व राहणार डोंगरशेळकी ता उदगीर
 3 आरोपीवर पो.ठाणे वाढवणा येथे व एका आरोपीवर पोलीस ठाणे उदगीर येथे कलम 65(ड)(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे एकूण 4 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथक मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, कोळसुरे, प्रकाश भोसले, सिद्धेश्वर जाधव, नितीन कठारे, मनोज खोसे, राहुल कांबळे, नकुल पाटील, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात