Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर म्हणजे सर्वधर्म समभाव व सामाजिक सलोख्याचे प्रतिक : ना. संजय बनसोडे

उदगीर म्हणजे सर्वधर्म समभाव व सामाजिक सलोख्याचे प्रतिक : ना. संजय बनसोडे

उदगीरकरांनी गणेश विसर्जनाचा शांतताप्रिय पॅटर्न निर्माण करावा

उदगीर : उदागिर बाबांच्या या पावननगरीमध्ये
 आजोबा गणपती बसविण्याची परंपरा ही
१९५० पासूनची आहे. या भागातील ज्येष्ठ नागरिकांनी ही परंपरा सुरु केली होती तीच परंपरा आता पुढील युवा पिढी गेल्या ७ - ८ दशकापासुन सुरु ठेवली आहे. अनेक सामाजिक उपक्रम या गणेश मंडळाच्या वतीने राबवून समाजिक सलोखा जपण्याचे काम या मंडळाच्या वतीने होत आहे. उदगीर शहर म्हणजे सर्वधर्म समभाव व सामाजिक सलोख्याचे प्रतिक असुन या शहरात सर्व जाती - धर्माचे नागरीक एकत्र येवून सामाजिक एकोप्याने राहत असल्याने आपल्या मतदार संघाची एक नवी ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश्वर निटुरे, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर - घुगे, पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, पोलीस उप- अधिक्षक ( भा.पो.से) निकेतन कदम, अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप भागवत, उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत कदम, तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, पोलीस निरीक्षक अरविंद पवार, शहरचे पो.नि. परमेश्वर कदम, रा.काँ. चे प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, माजी उपनगराध्यक्ष संग्राम हुडगे, राजकुमार हुडगे, प्रा.डाॅ.श्याम डावळे, सुरेश कुरुपखेळगे, सुभाष धनुरे, प्रा.मल्लेश झुंगास्वामी, भारत करेप्पा, उत्तरा कलबुर्गे, अमोल निडवदे, शशिकांत बनसोडे, कुणाल बागबंदे, चेतन वैजापुरे, अविनाश गायकवाड, बाबासाहेब सुर्यवंशी,  अजोबा गणपतीचे अध्यक्ष बबलु मुळे, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, उदगीर शहराने गेल्या साडेचार वर्षात विकासाचा एक वेगळा पॅटर्न निर्माण केला आहे. गणेश विसर्जनाच्या निमित्ताने शांततेत व वेळेत विसर्जन करून शहरातील गणेश मंडळांनी गणेश विसर्जनाचा एक नवा उदगीरचा पॅटर्न तयार करावा असे आवाहन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी केले.
 दरवर्षी आपण विसर्जन मिरवणुकीच्या अगोदर मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा करुन आपल्या मानाच्या गणपतीचे विसर्जन मिरवणुकीसाठी आपण मार्गस्थ होत असतो ही आपली अनेक वर्षापासुनची प्रथा आणि परंपरा आहे. मागील काळात उदागिर बाबांच्या भुईकोट किल्यासाठी कोटयावधी रुपयाचा निधी उपलब्ध करुन किल्ला दुरूस्तीचे काम केले तर परवा आपण उदागिर बाबांच्या समाधी स्थळाच्या सुशोभिकरणासाठी १ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.
बाप्पांच्या मिरवणूक मार्गावर 
२७० सी.सी. टी.व्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे सर्वांनी शांततेत विसर्जन मिरवणुकीस सुरुवात करुन वेळेत बाप्पांचे विसर्जन करावे असे सांगितले.
यावेळी पारकट्टी गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक, महिला व परिसरातील गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात