वाढवणा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सभासदांची मत्स्य व्यवसाय विभागाकडून क्रियाशीलता तपासणी
उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्पावर सन 1975 मध्ये स्थापन झालेल्या व संस्थेच्या सभासदांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या, वाढवणा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित वाढवणा (बु.) तालुका उदगीर या संस्थेच्या सर्व सभासदांची क्रियाशीलता तपासणी पूर्व सूचनेप्रमाणे जिल्हा मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून दि.16-09-2023 रोजी सहाय्यक आयुक्त व्यवसाय लातूर श्री जे. एस.पटेल व सहा.मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्री सय्यद हमजा यांच्या उपस्थितीमध्ये तिरु मध्यम प्रकल्पावर करण्यात आली.
यावेळी सभासदांनी मासेमारीसाठी लागणारे सर्व साहित्य सोबत घेऊन येऊन, तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्या समक्ष तलावात मासेमारीचे जाळे टाकून, मासेमारीचा अनुभव असल्याचे दाखवले.
यावेळी या क्रियाशीलता तपासणीच्या वेळी वाढवणा मत्स्य संस्थेच्या चेअरमन सौ आशाबी जब्बार पठाण व सचिव रऊफ इस्माईल शेख व संस्थेचे सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 Comments