उदगीर दर्पण संपर्क कार्यालयाचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते उद्घाटन
उदगीर:छत्रपती शाहू महाराज चौक येथे साप्ताहिक उदगीर दर्पण संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उदगीर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले.यावेळी पोलीस कर्मचारी गजानन पुल्लेवाड,पोलीस कर्मचारी योगेश फुले,पोलीस कर्मचारी मालूरे, बहुजन विकास अभियान प्रमुख संजयकुमार कांबळे,दलित पँथरचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती सांगवे,संजय राठोड सोमनाथपुरकर,मानसिंग पवार,उदगीर दर्पणचे संपादक सुधाकर नाईक,दिवाकर नाईक,आदी उपस्थित होते.यावेळी साप्ताहिक उदगीर दर्पण व साप्ताहिक विक्रांत परविवाऱ्याच्या वतीने पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
0 Comments