इच्छापूर्ती मंदिरा समोर एसटी बस मधून महिला उतरताना सोन्याचे मंगळसूत्र पळविले
उदगीर:अहमदपूर रोड इच्छापूर्ती हनुमान मंदिरासमोर महिला एसटी बस मधून उतरताना एक तोळ्यांचा सोन्याचा मंगळसूत्र पळविल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आशा सदानंद जोंधळे ही महिला शिरूर ताजबंद येथून एसटी बसने उदगीरकडे येत होत्या उदगीर अहमदपूर रोडवरील इच्छापूर्ती हनुमान मंदिरा जवळ एसटी बस थांबली फिर्यादी महिला एसटी बस मधून उतरत असताना गर्दीत 22 नोव्हेंबर रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्यांने महिलेच्या गळ्यातील एक तोळ्यांचे 35 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले आहे.अशी फिर्याद आशा सदानंद जोंधळे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात चोरट्यांवर गुरंन 668/23 कलम 379 भादवी प्रमाणे 4 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल शिरसे यांच्या कडे देण्यात आला आहे.
0 Comments