मातृभूमी महाविद्यालयात ''नमो चषक'' क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन
उदगीर विधानसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली युवा मोर्चाच्या वतीने ''नमो चषक'' क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे . याचे उद्घाटन मातृभूमी महाविद्यालय उदगीर येथे झाले असून या नमो चषकाचे आयोजन उदगीर तालुक्याचे युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यानी केले आहे .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मातृभूमी महाविद्याल्याचे संस्थापक अध्यक्ष सतिश उस्तूरे, उदगीर विधानसभा संयोजक वसंत शिरसे, तालुकाध्यक्ष शिवशंकर धुप्पे, उदगीर शहर अध्यक्ष मनोज पुदाले, उदगीर विधानसभा सोशल मिडिया संयोजक अमोल भालेराव, माजी न प .उपाध्यक्ष सुधीर भोसले, माजी नगर सेवक अॅड . दत्ताजी पाटील, जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष अमोल निडवदे, महिला जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, शहर अध्यक्ष शिल्पा इंगळे, रमाबाई वाघमारे,स्वाती वट्टमवार, शिवगंगा बिरादार, वर्षा धावारे, व सोशल मिडिया सहसंयोजक महादेव घोणे उपस्थित होते . या प्रसंगी सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले.
यावेळी या नमो चषक विषयी सविस्तर माहित अँड. दत्ताजी पाटील देताना सांगितले की भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हा महोत्सव होणार आहे. उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये १० जानेवारीपर्यंत या स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या लहान मुलांपासून मोठ्या पर्यंत उदगीर विधानसभा कार्यालयामध्ये नावनोंदणी ठेवली असून यामध्ये कुस्ती, फुटबॉल, व्हॉलीबॉल, क्रिकेट, रस्सीखेच, कॅरम, बुद्धिबळ, कबड्डी, धावणे आदी क्रीडा प्रकार घेण्यात येणार आहेत. यासाठी महिला व पुरुष असे दोन गट असणार आहेत.’’
सांस्कृतिक प्रकारामध्ये चित्रकला, रांगोळी, गीत गायन, नृत्य, एकांकिका, वकृत्व आदी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धा खुल्या गटात एकत्रित असणार आहेत. हा महोत्सव माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या स्पर्धेत नोंदणी करण्यासाठी नमो अँपवर ऑनलाईन नोंदणी करता येते व आपल्याकडे ऑफलाईन फॉर्म उपलब्ध आहेत. या नमो चषकाचे वेळापत्रक नोंदणीकृत खेळाडूना लवकरच कळवण्यात येईल . याप्रसंगी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे यानी याचसोबत भाजपा तर्फे दहा वर्षात केलेल्या विकास कामाची माहिती देणारे व थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संवाद साधण्यासाठी नमो अँपचा वापर करा असे सांगून नमो चषकात सहभाग घेण्यासाठी क्रिडा विषय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . . या कार्यक्रमाचे प्रा . बिभीषण मद्देवाड यांनी प्रास्ताविक केले तर प्राचार्य मनोज गुरुडे यांनी आभार मानेले . कार्यक्रमाच्या शेवटी कांही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन फार्म भरला .
0 Comments