देगलूर रोडवर दोन गटात तुफान हाणामारी,परस्परविरोधी 12 लोकांवर गुन्हे दाखल
उदगीर शहरातील देगलूर रोडवर आयुर्वेदिक महाविद्यालय जाणाऱ्या रोडवर दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी 12 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे,पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देगलूर रोडवर आयुर्वेदिक कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर 27 डिसेंबर रोजी कचरा टाकण्याच्या कारणावरून वाद झाला वादाचे रूपांतर गैर कायद्याची मंडळी जमवून हाणामारीत झाले दोन्ही गटांकडून एकमेकांना काठीने,लोखंडी रॉडने,लाथाबुक्याने मारहाण करण्यात आली परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण 12 लोकांवर कलम 143,149,147,323,504,506,भादवी प्रमाणे 28 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक श्रीमंगल हे करीत आहेत.
0 Comments