श्री स्वामी समर्थ सेवा मुख्य केंद्रा तर्फे शालेय गणवेश वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
दत्त जयंती सोहळा 2023 अवचित्य साधून अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार मुख्य केंद्र नांदेड रोड उदगीर यांच्या वतीने साक्षात परब्रम्ह स्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र दादासाहेब मोरे, आबासाहेब मोरे, नितीन भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.ए बी अंध शाळेतील अंध विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप, व वृक्षारोपण- फळ वाटप तसेच संस्कार विद्यालयात वृक्षारोपण व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा समोरील रस्त्याच्या मधोमध असलेल्या डीवायडर मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्कार प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. आर मुसने,एम.ए.बी अंधशाळेतील शिक्षक प्रभाकर गव्हाणे, मोगलाजी तुकडे, सुधाकर भंडारे, तालुकाध्यक्ष सचिन बामनपल्ले, माधव सूर्यवंशी,बाबासाहेब देशमुख, मयुरी देशमुख,निवृत्ती जवळे, ऐश्वर्या चिमणचोडे, सारिका देशमुख, पार्थ करेप्पा, गणेश हंडरगुळे,सुनीता हंडरगुळे, तानाजी केंद्रे,वामन पोलावार या कार्यक्रमासाठी योगदान देणारे मीना चिमणचोडे,गजानन मुक्कावार, व्यंकटेश हैबतपुरे, स्वाती केंद्रे,सचिन बामनपल्ले, आशिष होनकर,बाबासाहेब देशमुख यांचे मोलाचे योगदान लाभले.
0 Comments