*मतदार संघातील सर्व समाजघटकांना न्याय दिला : क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे*
*उदगीर* : उदगीर, जळकोट तालुक्यात व परिसरात मराठा समाज बांधव मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. मराठा समाजाच्या वतीने आयोजित सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी तसेच प्रशासकीय कामे, गरजु विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, अभ्यासाची सोय व ग्रामीण भागातील नागरीकांच्या व्यवस्थेसाठी एक सुसज्ज वास्तुची आवश्यकता असल्याने उदगीर शहरात मराठा भवन बांधकाम करण्यासाठी मराठा समाजबांधवांनी आपल्याकडे मराठा भवन उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी काही दिवसापुर्वी केली होती त्यांच्या मागणीचा विचार करुन 'वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन' १० कोटी रुपयाचा निधी मंजुर करुन दिला असल्याने मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण केल्याचे आज मला समाधान वाटत असुन लवकरच मराठा भवनाच्या कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या ४ वर्षाच्या काळात
मतदार संघातील सर्व समाजघटकांना न्याय दिला असल्याचे मत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण , बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते निडेबन येथे मराठा भवन व मराठा समजातील विद्यार्थ्यांकरीता वसतीगृह बांधकामास १० कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल निडेबन ग्रामस्थांच्या वतीने आयोजीत सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते.
यावेळी निडेबनच्या सरपंच जयश्री बेल्लाळे, उपसरपंच फय्याज अत्तार, मादलापुरचे सरपंच उदय मुंडकर, बाजार समितीचे संचालक प्रा.श्याम डावळे,विजयकुमार पाटील बामणीकर, शिवाजी महाराज बिजलगावकर, माजी उपसरपंच उमाकांत तपशाळे, शहराध्यक्ष समीर शेख, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, सय्यद जानीमियाॅ , अनिल इंगोले, मनोज बेल्लाळे, बालाजी भोसले पाटील, मदन पाटील, माजी सरपंच सतिश पाटील मानकीकर, सुनिल सोमवंशी, धनाजी जाधव, प्रा.बालाजी पाटील, निडेबनचे तलाठी अमोल रामशेट्टी, ग्रामसेवक शरद जाधव, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय बनसोडे यांनी, निडेबनकरांच्या मागणीचा विचार करुन राजमाता जिजाऊंच्या नावाने सभागृहासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असुन विठ्ठल रूक्मिणी नावाने निडेबन भागात प्रवेशव्दार बांधकामासाठी आमदार फंडातुन निधी देणार असल्याचे जाहिर केले. निडेबन गावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ११ कोटी रु मंजूर केले असुन मतदार संघात पाणी टंचाई भासु नये म्हणून वाटरग्रीड योजनेसाठी ९०० कोटी रुपयाचा निधी मंजुर करुन घेवुन कामाला सुरुवात केली आहे. आपल्या भागातील नागरिकांना मूलभूत गरजा पुरविणे हे लोकप्रतिनिधीचे काम असुन उदगीर मतदार संघात मागील ४ वर्षात विकासाचा डोंगर उभा केला आहे. आता आपल्या उदगीर शहराची जिल्हानिमिर्तीकडे वाटचाल असुन भविष्यात आपण जिल्हानिर्मितीसाठी प्रयत्नशील असल्याचे ना.बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी दशरथ शिंदे, प्रा.दिलीप पाटील, सुनिल इंगोले, विठ्ठलराव पाटील, गोविंद निटुरे, प्रमोद काळोजी, दामाजी बालुरे, अशोक सोनवणे, चंद्रकांत जाधव, प्रा.राजकुमार बिरादार, पुतळाबाई जाधव, शंकुतला पाटील, रेणुका बिरादार, उषाताई खुळे, आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत जाधव व मीनाक्षी शिंदे यांनी केले. यावेळी निडेबन सह परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments