बसवेश्वर गल्लीत चाकूने भोसकून महिलेचा खून शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल
उदगीर:शहरातील काळा मारोती मंदिर परिसरात चाकूने भोसकून महिलेचा खून केल्याची घटना ३ जुलै रोज बुधवारी रात्री घडली आहे. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बसवेश्वर गल्ली काळा मारोती मंदिर परिसरात आरोपीने मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून मनात राग धरून फिर्यादीची सासू शालूबाई चंद्रकांत अलमकेरे वय ५५ वर्ष यांच्या पोटात चाकूने वार करून खून केला.याप्रकरणी भाग्यश्री सुरेश अलमकेरे यांच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी सुरेश अमृतअप्पा अलमकेरे यांच्यावर गुरंन १९०/२४ कलम १०३ (१) ३५२ BNS प्रमाणे ४ जुलै रोज गुरुवारी पहाटे तीन वाजता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करीत आहेत.
0 Comments