Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर रोडवर चालत जाणाऱ्या युवकास दुचाकीची पाठीमागून धडक; युवकाचा मृत्यू...

देगलूर रोडवर चालत जाणाऱ्या युवकास दुचाकीची पाठीमागून धडक; युवकाचा मृत्यू...

उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा

उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरात घरातून भाजीपाला आणण्यासाठी गेलेल्या पंधरा वर्षीय युवकास पाठीमागून दुचाकीस्वाराने जोराची धडक दिल्याने युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुरुवारी (४ जुलै) रात्री साडेसातच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, दि.३ जुलै रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास शहरातील पंचशिलनगर देगलुर रोडवर फिर्यादीचा मुलगा शैलेश राजकुमार कांबळे (वय १५ वर्षे रा. रावनकोळा ता. मुखेड जि नांदेड) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. हा भाजीपाला आणण्यासाठी नाइक चौक उदगीर कडे जात असताना पंचशिलनगर देगलुर रोड उदगीर चे पुढे रोडवर त्याचे पाठीमागुन भरधाव वेगात येणारी मोटार सायकल क्रं एम.एच.२४ बी.व्ही.२९२३ चे चालकाने त्याचे ताब्यातील वर नमुद मोटार सायकल हयगयी व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवुन पाठीमागुन येवुन जोराची धडक देवुन मुलाचे डोक्यात गंभीर दुखापत होउन त्याचे मरणास कारणीभुत झाला आहे.
याप्रकरणी कमलबाई राजकुमार कांबळे (रावणकोळा ता. मुखेड जि. नांदेड) यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं.३७२/२०२४ कलम १०६(१)(२),२८१
भारतीय न्याय संहीता २०२३ सह कलम १८४ मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बहात्तरे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात