मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना १ जुलै पासून लाभ मिळणार तहसीलदार राम बोरगावकर
उदगीर:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजने करिता १) महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील विवाहित,विधवा, घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.२) राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्याक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.३) किमान वयाची २१ वर्ष पूर्ण व कमाल ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरीता आवश्यक कागदपत्रे.
१) लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड.मतदार ओळख पत्र.शाळा सोडल्याचे प्रमाण पत्र.जन्म दाखला. यापैकी कोणतेही ओळख पत्र/प्रमाण पत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. अधिवास प्रमाणपत्रा करीता तहसील कार्यालयात गर्दी करण्यात येऊ नये.
२) परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाण पत्र किंवा अधिवास प्रमाण पत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.
३) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न २.५० लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे. तथापी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाण पत्रातून सूट देण्यात आली आहे.त्यामुळे उत्पन्न दाखला काढण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी करू नये.
सदर योजने करिता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिलांना दिनांक १ जुलै २०२४ पासून दरमहा १५०० रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
सदर अर्ज आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा महाई सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाइन करण्यात यावेत. याबाबत कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही असे आवाहन उदगीरचे तहसीलदार श्री.राम बोरगावकर यांनी केले आहे.
0 Comments