खेर्डा येथे जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या...
उदगीर तालुक्यातील खेर्डा येथे जनावरांच्या गोठ्यात गळफास घेऊन शेतकऱ्यांने आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना बुधवारी (३ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.विष्णुकांत रामराव बिरादार (वय ३५ वर्ष रा. खेर्डा ता. उदगीर) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास खेर्डा शिवारात विष्णुकांत रामराव बिरादार (वय ३५ वर्ष रा. खेर्डा ता. उदगीर) हा शेतातील जनावराचे बांधण्याचे पत्राचे शेडमधील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेवुन मरण पावला आहे.
याप्रकरणी दत्तात्रय नामदेव बिरादार (रा. खेर्डा ता. उदगीर) यांच्या फिर्यादीवरुन वाढवणा (बु) पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू नं.२३/२०२४ कलम १९४ भारतीय नागरिक सरंक्षण सहिंता नुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस कर्मचारी कलकत्ते हे करीत आहेत.
0 Comments