Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीर मतदार संघातील विविध पर्यटन, तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळे विकसीत करण्याकरिता निधी उपलब्ध करुन द्यावा

उदगीर मतदार संघातील विविध पर्यटन, तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळे विकसीत करण्याकरिता निधी उपलब्ध करुन द्यावा

*माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांची पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे मागणी*

*उदगीर* : उदगीर व जळकोट मतदार संघातील विविध पर्यटन, तीर्थक्षेत्र व धार्मिक स्थळे विकसीत करण्याकरिता प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत खालील  कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करुन निधी उपलब्ध करुन देण्याची माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांची पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली असुन या सर्व मागण्यांना लवकरच शासनाच्या पर्यटन विभागातुन निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभुराजे देसाई यांनी सांगितले आहे.

मतदार संघाचा भौतिक विकास करण्याबरोबरच ग्रामीण भागातील श्रध्दा स्थान असलेले त्या भागातील मंदिर देवस्थानाचे रुप बदल्याणासाठी आ.संजय बनसोडे हे प्रयत्नशील असुन लवकरच खालील मंदिराचा विकास होणार आहे.
राज्य शासनाने पर्यटन विभागातुन निधी उपलब्ध करुन दिल्यानंतर मतदार संघातील मौजे सोमनाथपूर ता.उदगीर येथील जगदंबा देवी मंदिर देवस्थान परिसरात सभागृह / प्रवेशद्वार बांधकाम, मौजे. चांदेगाव ता. उदगीर येथील संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थान परिसरात सभागृह / परिसर सुधारणा करणे, किनी (य.) ता. उदगीर येथील श्री दत्त मंदिर देवस्थान परिसरात सभागृह / परिसर सुधारणा करणे, मौ. कौळखेड ता. उदगीर येथील संगमेश्वर मंदिर देवस्थान परिसरात सभागृह / परिसर सुधारणा करणे, हंडरगुळी ता. उदगीर येथील श्री महादेव मंदिर देवस्थान परिसरात सभागृह दुरुस्ती / परिसर सुधारणा / प्रवेशद्वार बांधकाम करणे, मौ. हाळी ता. उदगीर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान परिसरात सुधारणा / विविध विकास कामे करणे, मौ. गुडसूर ता. उदगीर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान परिसरात सुधारणा / प्रवेशद्वार बांधकाम करणे, मौजे चिमाचीवाडी ता.उदगीर येथील श्री शामलदादा मंदिर देवस्थान परिसरात सुधारणा करणे, मौजे दावणगाव ता. उदगीर येथील श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान परिसरात सभागृह / परिसर सुधारणा करणे,
मौजे शंभू उमरगा ता. उदगीर येथील श्री महादेव मंदिर देवस्थान परिसरात सभागृह दुरुस्ती / पोहच रस्त्यावर पुल बांधकाम / परिसर सुधारणा करणे, मौ. वाढवणा (खु.) ता. उदगीर येथील श्री नामदेव महाराज मंदिर देवस्थान परिसरात सुधारणा करणे, मौ. जिरगा ता. जळकोट जि. लातूर येथील श्री. हनुमान मंदिर देवस्थान परिसरात सभागृह बांधकाम करणे, मौ. विराळ ता. जळकोट जि. लातूर येथील श्री समर्थ धोंडूतात्या मंदिर देवस्थान मंदिर दवस्थान परिसरात सभागृह बांधकाम करणे, मौ. वांजरवाडा ता. जळकोट जि. लातूर येथील संत गोविंद बाबा देवस्थान परिसरात सभागृह बांधकाम करणे,
 मौ. अतनुर ता. जळकोट जि. लातूर येथील श्री. महादेव मंदिर देवस्थान परिसर सुधारणा / प्रवेशद्वार बांधकाम करणे असे एकुण पंधरा गावातील विविध विकास कामांसाठी ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात येणार असुन यामुळे या भागाचा कायापालट होणार असल्याची माहिती माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी दिली आहे 

Post a Comment

0 Comments

जाहिरात