करखेली येथे लोखंडी राॅडने मारहाण; ८ जणांविरुद्ध गुन्हा
उदगीर तालुक्यातील करखेली शिवारात एकाला लोखंडी राॅडने व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी शुक्रवारी २० जून सायंकाळी पाचच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १८ जून रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास करखेली शिवारातील जमीन सर्वे नं.६० मध्ये फिर्यादी व साक्षीदार यांना यातील आरोपीतांनी गैर कायदयाची मंडळी जमवुन फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात लोखंडी रॉडने व कुऱ्हाडीच्या दांड्याने मारुन गंभीर जखमी केले, तेव्हा आमच्या भांडणाचा आवाज ऐकुन पुतन्या महादेव शिंदे, दिर बालाजी शिंदे, पुतन्या राहुल बालाजी शिंदे, मारोती शिंदे असे मिळुन आमच्याकडे येवुन भांडण सोडवित असतांना ज्योतीराम विठल शिंदे यांनी त्याचे हाताती लोखंडी रॉडणे महादेव याचे उजव्या हातावर मारुन जखमी केले. राम नारायण शिंदे याने त्याचे हातातील काठीने बालाजी शिंदे यांना मारुन जखमी केले. बापुराव मनोहर शिंदे यांनी माझ्या पतीस काठीने मारहाण केली. विलास साधुराम शिंदे याने त्याचे हालातील काठीने राहुल बालाजी शिंदे यांना मारहाण केली तसेच गोंविद विलास शिंदे याने पुतन्या मारोती शिंदे यांना लाथबुक्याने मारहाण केली व व्यंकट विलास शिंदे यांनी पुतन्या महादेव यास लाथबुक्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार अनिता बाबुराव शिंदे यांनी दिल्यावरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ११८(२), ३५२, ३५१(२), १९०, १८९(२), १९१(३), १९२ भारतीय न्याय सहिंता नुसार किशन बापुराव शिंदे, ज्योतीराम विठल शिंदे, राजकुमार/हंसराज बाबुराव शिंदे, बापुराव मनोहर शिंदे, विलास साधुराम शिंदे, गोविंद विलास शिंदे, व्यंकट विलास शिंदे, राम नारायण शिंदे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकत्ते हे करीत आहेत.
0 Comments