Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

*मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीर*



*मध्यवर्ती बसस्थानक, जुना रेणापूर नाका बसस्थानकावरून २३ जून पासून सुटणाऱ्या बस फेऱ्यांचे नियोजन जाहीर*

लातूर, दि. २०:  शहरातील गांधी चौक येथील मध्यवर्ती बस स्थानक क्र. १ आणि अंबेजोगाई रोडवरील जुना रेणापूर नाका येथील बसस्थानक क्र. २ येथून सुटणाऱ्या बसफेऱ्यांचे नवीन नियोजन जाहीर करण्यात आले आहे. २३ जून, २०२५ पासून या नियोजनानुसार बसेस सुटतील, असे राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक यांनी कळविले आहे.

*मध्यवर्ती बसस्थानक क्र. ०१ येथून सुटणाऱ्या बसेस-*

१. लातूर - नांदेड, नागपूर, अमरावती, अकोला मार्गावरील सर्व ग्रामीण, शटल, लांब पल्ला व मध्यम लांब पल्ला बसेस. 
२. लातूर-तुळजापुर- सोलापूर-पंढरपूर-कोल्हापूर मार्गावरील सर्व बसेस. 
३. लातूर-धाराशिव मार्गावरील सर्व शटल बसेस व पुढे तुळजापुर, सोलापुर मार्गावर जाणा-या बसेस. 
४. लातूर- आष्टा-उदगीर मार्गावरील सर्व ग्रामीण, शटल, लांब पल्ला व मध्यम लांब पल्ला बसेस. 
५. लातूर-जळकोट, मुखेड, बिलोली, निजामाबाद मार्गावरील सर्व ग्रामीण, शटल, लांब पल्ला व मध्यम लांब पल्ला बसेस. 
६. पुणे मार्गावरुन येऊन पुढे नांदेड, उदगीर, मुखेड या मार्गावर धावणाऱ्या सर्व बसेस मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक ०१ येथे प्रवाशी चढ उतार करून पुढे नांदेड, उदगीर मार्गावर धावतील. 
७. लातुर-औसा, लातुर-उमरगा, लातुर-निलंगा व पुढे बिदर, हैदाबाद जाणा-या सर्व बसेस. 
८. औसा व निलंगा आगाराच्या पुर्ववत चालु असलेल्या सर्व ग्रामीण व रात्रवस्ती बसेस. मध्यवर्ती बसस्थानक येथील ग्रामीण बसस्थानकावरुन सुटणा-या बसेस.

*बसस्थानक क्र. ०२ जुना रेणापूर नाका अंबेजोगाई रोड लातूर येथून सुटणाऱ्या बसेस-*

१. लातुर-अंबेजोगाई बीड मार्गावरुन पुढे धावणाऱ्या सर्व बसेस. 
२. लातुर -अंबेजोगाई- परळी- परभणी मार्गावरुन पुढे धावणाऱ्या सर्व बसेस. 
३. लातुर - बार्शी - इंदापुर पुणे - मुंबई मार्गावरुन धावणाऱ्या सर्व बसेस.
*****

Post a Comment

0 Comments

जाहिरात