बिदर गेट येथून प्राध्यापकांचे अपहरण 50 लाखांची मागितली खंडणी 8 लाख 14 हजार रुपये लुटले
उदगीर:बिदर गेट येथून एका प्राध्यापकांचे चौघांनी अपहरण करून 50 लाखांची खंडणी मागत 8 लाख 14 हजार रुपये लुटल्याची घटना घडली आहे, पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी सदाविजय बसवप्रकाश विश्वनाथे यांना चौघां आरोपीने संगनमत करून फिर्यादीचे 16 ऑक्टोबर रोजी अपहरण करून फिर्यादीस प्लास्टिकच्या पाईपने व लाथाबुक्याने मारहाण करून फिर्यादीकडे 50 लाख रुपये खंडणीची मागणी केली,फिर्यादी व फिर्यादीच्या मित्राकडून ऑनलाईन पद्धतीने बळजबरीने पैसे मागवून घेण्यास भाग पाडले व वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम मधून रोख काढण्यास फिर्यादीस भाग पाडले असे एकूण 8 लाख 14 हजार रुपये काढून घेतले व फिर्यादीच्या नावाचे बॉण्ड खरेदी करून फिर्यादीच्या बॅंक अकाऊंटचा चेक सहिनीशी ताब्यात घेऊन ही माहिती घरच्यांना दिली तर तुला जीवे ठार करू अशी दमदाटी देऊन भालकी येथे सोडून देऊन निघून गेले असी फिर्याद सदावीजय बसवप्रकाश विश्वनाथे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरुन आरोपी पठाण गफार इस्माईल उर्फ बबलू पठाण,राहणार समता नगर उदगीर,पवन बिरादार शिरोळकर,बालाजी वय अंदाजे 30 ते 35 वर्ष,एसटी कॉलनी येथून बसलेला एक अनोळखी इसम या चौघांवर गुरंन 614/23 कलम 364(A),365,368,384,386,323324,343,346,347,504,506,34 भादवी प्रमाणे 18 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम हे करीत आहेत.
0 Comments