अवलकोंडा येथे कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून डोके फोडले,तिघांवर गुन्हे दाखल
उदगीर:तालुक्यातील अवलकोंडा येथे कुऱ्हाडीच्या दांड्याने मारून डोके फोडल्या प्रकरणी तिघां आरोपीवर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती असी की अवलकोंडा येथे १६ जानेवारी रोज मंगळवारी सकाळी ११ वाजता आरोपीने संगनमत करून फिर्यादीच्या घरात प्रवेश करून कुऱ्हाडीचा दांडा डोक्यात घालून जखमी केले व दगडाने मारून लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असी फिर्याद चंद्रप्रकाश प्रल्हादराव बिरादार यांनी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी राजू रामराव सुडे,दिनेश राजू सुडे,सरोजा राजू सुडे यांच्यावर गुरंन १६/२४ कलम ३२४,३२३,४५२,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे १६ जानेवारी रोज मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल धुळशेट्टे हे करीत आहेत.


0 Comments