उदगीर आयकॉन प्राजक्ता भांगेचा चला कवितेच्या बनात मध्ये सत्कार.
उदगीर:एम.आय.टी पुणे येथे संपन्न झालेल्या तेराव्या भारतीय छात्र संसदेत संपूर्ण देशभरातून तीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात प्रत्येकाने आपापले कौशल्य दाखवले होते. संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या या स्पर्धेत उदगीरची आयकॉन कुमारी प्राजक्ता सर्जेराव बांगे या विद्यार्थिनीने सर्वप्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल तिचा भव्य असा सत्कार देखील त्या ठिकाणी करण्यात आला .
संपूर्ण उदगीरकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केलेल्या व जिल्हा परिषद शिक्षक पतपेढी उदगीर, देवणी, जळकोट तालुक्याचे सचिव तथा एक आदर्श व्यक्तिमत्व लाभलेले शिक्षक नेते सर्जेराव भांगे यांची सुकन्या कुमारी प्राजक्ता भांगे हिचा या यशाबद्दल चला वितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळीच्या वतीने राजमुद्रा अकॅडमी लातूरचे संचालक डॉ. महेश मोरे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी चला कवितेच्या बनातचे संयोजक अनंत कदम, सर्जेराव भांगे, प्रा. राजपाल पाटील याचबरोबर अनेक मान्यवर उपस्थित होते प्राजक्ताच्या या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
0 Comments