कापड दुकानातून बाहेर जाऊन येतो म्हणून गेलेला युवक परत आला नाही,शहर पोलिसांत मिसिंग दाखल
उदगीर:शहरातील मोंढा रोड येथील गणेश कापड दुकानातील युवक मयूर मधुकर वट्टमवार याने बाहेर जाऊन येतो म्हणून परत आलाच नसल्याने उदगीर शहर पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मधुकर गुंडपा वट्टमवार कापड व्यापारी यांचा मुलगा मयूर मधुकर वट्टमवार वय 37 वर्ष हा दुकानातून बाहेर जाऊन येतो म्हणून गेला तो परत आलाच नाही त्याचा इतरत्र नातेवाईकांकडे व मित्राकडे शोध घेतला असता मिळून आला नाही.त्याचे वर्णन वय 37 वर्ष रंग सावळा,नाक नकटे, बांधा जाड, चेहरा गोल,निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट,केस काळे,उंची पाच फूट पाच इंच,पांढरी चॉकलेटी चप्पल, हातात सोन्याची अंगठी,एक मोबाईल असा वर्णन असलेला माझा मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार मधुकर गुंडपा वट्टमवार यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून मिसिंग नंबर 01/24 प्रमाणे 5 जानेवारी रोजी नोंद करण्यात आली आहे, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पुटेवाड हे करीत आहेत.


0 Comments