Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

मतदार संघातील ८ रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन २५ कोटी ६६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर

*मतदार संघातील ८ रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन २५ कोटी ६६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर*

*क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*

*उदगीर* :  उदगीर जळकोट मतदार संघातील अनेक गावे गेल्या कित्येक वर्षापासून रस्त्यापासुन वंचित होते. त्यामुळे तेथील ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती तर काही रस्त्यांची दुर्दशा झाल्यामुळे अपघात होत होते ही बाब नामदार संजय बनसोडे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून अनेक वाडी, तांडे व गावे विकासापासून दूर होते त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनदरबारी मागणी करुन कोट्यावधी रुपयाचा निधीची तरतुद करुन तो निधी मंजूर करुन घेतला. गेल्या कित्येक वर्षात अनेक लोकप्रतिनिधी होऊन गेले पण छोट्या गावात व वाडी तांड्यावर कोणीच लक्ष दिले नव्हते मात्र मतदार संघातील एका एका गावात अनेकवेळा जावुन नागरीकांच्या अडचणी समजून घेत असतात. आज मतदार संघातील ८ रस्त्यांसाठी
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा - २  संशोधन व विकास अंतर्गंत ग्राम विकास विभागातुन २५ कोटी ६६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर करुन घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

यामध्ये उदगीर तालुक्यातील दावणगाव ते येणकी ( ODR- ६३) या ४.७ कि.मी. रस्त्यासाठी ४ कोटी ४६ लक्ष रु., प्रजिमा -३१ ते आडोळतांडा रस्ता (VR-७०) या २.२ कि.मी. रस्त्यासाठी २ कोटी ६० लक्ष रु., राष्ट्रीय महामार्ग - ६३ बोरताळातांडा टिकाराम तांडा मारुती तांडा रस्ता (VR-३२) या २.४ कि.मी रस्त्यासाठी २ कोटी ४६ लक्ष रु., जळकोट तालुक्यातील मरसांगवी ते चतरुतांडा रावणकोळा रस्ता (VR-३०) या ३.९ कि.मी. रस्त्यासाठी ४ कोटी २२ लक्ष रु., राज्यमार्ग २६८ ते धोंडवाडी ते धर्मातांडा रुपला तांडा रस्ता (VR-४२, ४७) या ४.८ कि.मी. रस्त्यासाठी ५ कोटी ४७ लक्ष रु., 
इजिमा - ५४ ते जिल्हा सरहद्द दापका रस्ता ( VR-२६) २.७ कि.मी. च्या रस्त्यासाठी २ कोटी ९७ लक्ष रु., इजिमा - ५४ ते जळकोट तांडा रस्ता (VR-२४) या २.७ कि.मी. च्या रस्त्यासाठी २ कोटी ३७ लक्ष रु. तर राज्यमार्ग २५१ ते उमरगा रेती रस्ता (VR-३) या १.२ कि.मी. च्या रस्त्यासाठी १ कोटी ८ लक्ष रुपये अशा एकुण २४.८ कि.मी. च्या ८ रस्त्यांसाठी २५ कोटी ६६ लक्ष रुपयाचा निधी मंजूर केल्याने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना.संजय बनसोडे यांचे मतदार संघातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात