कत्तलखाण्यात गोवंशला घेवून जाणारा टेम्पो मनसेच्या कार्यकर्त्यांनी पकडले,तिघांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल
उदगीर:शहरातील नळेगाव रोडवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोवंशाला कत्तलखाण्याकडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले याप्रकरणी तिघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की उदगीर शहरातील के.जी.एन.हॉटेल समोर नळेगाव रोडवर आरोपीने संगनमत करून बेकायदेशीर पणे गोवंशची वाहतूक करीत असताना टेम्पो पकडला टेम्पोत एकूण 17 गोवंश जातीचे बैल,प्रति बैलाची अंदाजे किंमत दहा हजार रुपये प्रमाणे एक लाख सत्तर हजार रुपये व अशोक लिलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक एम.एच.20 जी.सी.8196 किंमत सात लाख रुपये असा एकूण आठ लाख सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव परशुराम मुंढे यांनी दिल्यावरून उदगीर शहर पोलीस ठाण्यात आरोपी रफिक मोहमद शेख राहणार बोरगाव बाजार ता.सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर,फयाज कदिर शेख राहणार बागरी ता जामनेर जि जळगाव,जाकीर अब्दुल अजीज राहणार बोरगाव ता सिल्लोड जि छत्रपती संभाजीनगर यांच्यावर गुरंन 12/2024 कलम 5 (अ) 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 सुधारित 2015 सहकलम 11 (1)(3) प्रमाणे 7 जानेवारी रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करीत आहेत,सर्व गोवंशाची सुटका करून गोशाळा सोमनाथपुर येथे पाठवली


0 Comments