Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

चोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

चोरलेले दागिने विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

 लातूर:याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी/अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
 दरम्यान 08/01/2024 रोजी10:30 पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने  विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला औसा रोड परिसरातून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांने त्यांचे नाव
1) भरत इंद्रजीत कदम, वय 27 वर्ष, राहणार पवार नगर,औसा 
असे असल्याचे सांगितले. नमूद आरोपीला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की, दिनांक 07/01/2024 रोजी पवार नगर, औसा येथील घरातून चोरी केली आहे.
 त्यावरून औसा पोलीस ठाण्याच्या अभिलेखाची माहिती घेतली असता पोलीस ठाणे औसा येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 05/2024 कलम 380 भादवी प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल असल्याचे दिसून आले.
नमूद आरोपीने वर गुन्ह्यात  चोरलेली सोन्याची 15 ग्रॅम वजनाची एक पाटली 90,000/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस पोलीस अमलदार मनोज खोसे, साहेबराव हाके, नितीन कठारे, चालक चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात