उदगीरात कामगार जागृती मेळावा संपन्न
उदगीर: शहरात ७ जानेवारी रोजी अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने उदगीर शहरांमध्ये कामगार जागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते हिंगुलांबिका देवी मंदिर आर्य समाज चौक उदगीर येथे सकाळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष राजेश्वरजी नीटूरे होते.तर कार्यक्रमाला लातूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकरराव एकुर्केकर, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कामगार नेते राजकुमार होळीकर, माजी नगरसेवक नरसिंग शिंदे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष उत्तराताई कलबुर्गे, सुभाष धनुरे, पत्रकार संपादक शिवाजीराव कांबळे, मानवाधिकार कार्यकर्ते नितीन एकुर्केकर, किशोर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी कामगार कायदा उपलब्ध केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे संयोजक आरती शेटकर, शिल्पा काळे, प्रीती काळे, अरुण उजेडकर, राम काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास उदगीर शहरातील शेकडो महिला कामगार उपस्थित होत्या.


0 Comments