Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

दिनदर्शिकेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या निर्णयाची माहिती घरोघरी

दिनदर्शिकेच्या माध्यमातून मोदी सरकारच्या निर्णयाची माहिती घरोघरी

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन : मनोज पुदाले

उदगीर : गेल्या दहा वर्षात केंद्रात सत्तेवर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने राबविलेल्या जनहिताच्या महत्वपूर्ण व महत्वाकांक्षी निर्णयाची माहिती भाजपाचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी दिनदर्शिकेच्या माध्यमातून घरोघरी पोहोचविण्याचे काम केले आहे. या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 
यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगरसेवक ॲड दत्ताजी पाटील, प्रदीप कापसे, प्रशांत रंगवाळ, राहुल स्वामी, राजकुमार देशमुख आदी उपस्थित होते.
मागच्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शिवाय अनेक महत्वाकांक्षी कायदे संसदेत मोदी सरकारने मंजूर केले आहेत. या निर्णयाची माहीती सामान्य जनतेपर्यंत पोहोचली जावी या उद्देशाने उदगीर भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी मोदींच्या निर्णयाची माहिती असलेली दिनदर्शिका प्रकाशित करून ती घरोघरी वाटप करण्यात आली आहे. या दिनदर्शिकामध्ये मोदी सरकारच्या काळात राम मंदिराची होत असलेली उभारणी, आयुष्यमान भारत योजना, जीवन ज्योती बिमा योजना, अटल पेन्शन, गरीब कल्याण अन्न योजना, शेतकरी सन्मान निधी योजना, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री जन धन योजना, उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग निर्माण व कलम 370 व 35 अ हटविणे या निर्णयाची माहिती दिनदर्शिकावर देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर वरच्या कोपऱ्यात क्यू आर कोड देण्यात आला आहे. हा क्यू आर कोड मोबाईल मध्ये स्कॅन केला की त्या योजनेची संपुर्ण माहिती नागरिकांना पहावयास मिळणार आहे. ही केंद्र सरकारच्या योजनेची माहिती असलेली दिनदर्शिका उदगीर शहरात घरोघरी पोहोचविण्यात येत असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात