Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

सामान्य शासकीय रुग्णालयात प्रसूती तर खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू! डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा पतीचा आरोप

प्रसूतीनंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू! डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा पतीचा आरोप

उदगीर - उदगीरच्या सामान्य रुग्णालयात दाखल प्रसुतीसाठी दाखल झालेल्या २५ वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर लगेचच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, बुधवारी (ता. १०) घडली आहे. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन, मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टराच्या हालगर्जीपणामुळे मुत्युस जबाबदार असणार्‍यावर कार्यवाही करण्याची मागणी करत राञी उशारापर्यत ठिय्या मांडला होता.
सविस्तर माहीती आशी की, पल्लवी कुणाल मोरे (वय-२५) ही गरोदर माता प्रसूतीसाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले होते. नैसर्गिक प्रसुती होत नसल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करून प्रस्तुती करण्यात आली. प्रसूतीनंतर तिची तब्येत खालावल्यामुळे तिला खाजगी रुग्णालयात दुपारी उपचारासाठी नेण्यात आले.
उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे खाजगी रुग्णालयाचे डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी शहर पोलीस ठाण्यास कळवले. यावरुन बुधवारी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. दरम्यान मयत महिलेच्या कुटबाने सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व खाजगी डॉक्टरांनी उपचारा दरम्यान निष्काळजीपणा केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला व तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी मयत महिलेच्या नातेवाईकांची समजूत काढून लेखी जबाब देण्यास सांगीतले त्यानुसार मयत महिलेचे पती कुणाल मोरे यांनी शहर पोलिसात लेखी जवाब दिला. त्यानंतर त्या महिलेचा मृत्यदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. गुरुवारी दुपारी शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता जाधव या करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

जाहिरात