*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचा लातूर जिल्हा दौरा*
लातूर, दि. १७ : राज्याच्या क्रीडा व युवक कल्याण, बंदरे विभागाचे मंत्री संजय बनसोडे हे १८ जानेवारी २०२४ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. बनसोडे यांचे १८ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजता लातूर येथे आगमन होईल व राखीव. सकाळी ८.४५ वाजता ते मोटारीने उदगीरकडे प्रयाण करतील. उदगीर तालुक्यातील लोणी एमआयडीसी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी १० वाजता होणाऱ्या श्री गुरु ह.भ.प. ब्रम्हनिष्ठ व विठ्ठल महाराज सांडोळकर यांचा समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत उदगीर येथील श्री लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयात मराठवाडास्तरीय स्व. बहादूर शास्त्री आंतरशालेय वादविवाद स्पर्धा २०२३-२४ कार्यक्रम होईल.
ना. बनसोडे हे दुपारी १ वाजता जळकोट तालुक्यातील रावणकोळा येथील श्रीमती वैजंताबाई उत्तम सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी १.३० वाजता रावणकोळा येथील श्रीमती कोंडाबाई शिवाजी सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देतील. दुपारी २ वाजता जळकोट येथून मोटारीने नांदेड जिल्ह्यातील कल्हाळीकडे प्रयाण करतील. दुपारी ३.३० वाजता कल्हाळी येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.
*****
0 Comments