बस्थानका समोर अज्ञात मोटरसायकलच्या धडकेत पत्रकार जखमी,शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उदगीर:शहरातील बस्थानकासमोर अज्ञात मोटरसायकलच्या धडकेत पत्रकारांचा पाय फ्याक्चर झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी 8 वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मोटरसायकल स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,११ जानेवारी रोजी समाजसेवक तथा पत्रकार बालाजी ज्ञानोबा पाटील वय ६८वर्ष राहणार दरेगाव ता.देगलूर जि.नांदेड हे बस्थान येथे रस्ता ओलांडताना अज्ञात मोटरसायकल स्वाराने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल हायगायी व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने गुडघ्याला व मांडीच्या वरच्या भागावर जबर मार लागून पाय फ्याक्चर झाला आहे व शरीराला ठिकठिकाणी मुक्का मार लागला आहे अशी फिर्याद बालाजी ज्ञानोबा पाटील यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात दुचाकी स्वारांच्या विरोधात १२ जानेवारी रोज शुक्रवारी गुरंन १५/२४ कलम २७९.३३७.३३८.भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जयराम पुठेवाड हे करीत आहेत.


0 Comments