श्री कृष्ण मंदिराचे विजयगीरी कल्याणकर महाराज महंत व ह.भ.प. उद्धव हैबतपूरे आयोध्येला प्रस्थान
उदगीर:आयोध्या येथे २२ जानेवारीला श्री रामजीची प्राणप्रतिष्ठपणा होणार आहे या निमित्ताने उदगीर येथील निमंत्रीत श्री कृष्ण मंदिराचे महाराज विजयगीरी कल्याणकर महंत महाराज व ह.भ. प . उद्धव हैबतपूरे महाराज यांचा आज दि. १२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वा. छ. शिवाजी महाराज चौक येथे पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला व जय श्रीरामाच्या घोषणा देण्याात आल्या .
यावेळी शालेय शिक्षण नितीमूल्य देवनागीरी प्रखंड प्रमुख संतोष कुलकर्णी, विश्व हिंदू परिषद शहर अध्यक्ष महादेव घोणे, शहर मंत्री श्रीपाद करंजीकर, उपाध्यक्ष प्रशांत काळेगोरे, जिल्हा समरसता प्रमुख विश्वनाथ गायकवाड, जिल्हा सहमंत्री सचिन जळकोटे, भाजपा युमोचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, भाजपा उदगीर शहर अध्यक्ष मनोज पुदाले, माजी नगर सेवक ऍड. दत्ता पाटील, रामेश्वर पवार,अभिजीत पाटील, कलप्पा स्वामी, बसवेश्वर बुक्का, ऍड. योगेश उदगीरकर,आनंद साबणे, मुदाळे, राजेश शेटकार,वाडकर आदी उपस्थित होते .


0 Comments