अतनूर येथे शिवसेना शाखेचे उद्दघाटन
माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नविन शाखा स्थापनेचा शुभारंभ अतनुरातून मंगळवार रोजी झाला. याबरोबरच रामपूर तांडा सह सहा गावात शिवसेनेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. या शाखेचे उदघाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांची उपस्थिती होती. तसेच शिवसेनेचे जळकोट तालुका प्रमुख मुक्तेश्वर पाटील अतनूरकर, उपतालुका प्रमुख विकास राठोड, विभाग संघटक गोविंद बारसुळे, तालुका सचिव अभंग मोहटे, अनिल ढोबळे, विभाग प्रमुख तुकाराम माने, उपतालुका प्रमुख अमोल गुट्टे, सर्कल प्रमुख नरसिंग सोर्गेकर, रवी पांचाळ, सोसिअल मीडिया प्रमुख कैलास कापडे, उपतालुका प्रमुख रामेश्वर स्वामी, राम गुट्टे, विलास केंद्रे तसेच प्रमुख पदाधिकारी, नवनियुक्त शाखा अध्यक्ष, पदधिकारीसह सर्व गावातील शिवसैनिक उपस्थित होते.


0 Comments