Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

जयंत पाटील व रोहित पवार यांची ईडी चौकशी रद्द करावी,राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

जयंत पाटील व रोहित पवार यांची ईडी चौकशी रद्द करावी,राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

उदगीर: राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत..
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उदगीरच्या वतीने मा. तहसीलदार साहेब यानां राज्यातील सामान्य लोकांना दररोज भेडसावणाऱ्या प्रश्नांबाबत पुढील प्रमाणे निवेदन देण्यात आले राज्यात युवा, विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार, महिला सुरक्षा, कामगार, अंगणवाडी सेविका असे सर्वच घटक हे त्रस्त असून या सर्व घटकांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे. कापूस, सोयाबीन, कांदा, तूर या शेत मालाला भाव नाही, अतिवृष्टीमुळे किंवा दुष्काळामुळे पिकाचे नुकसान होऊन ही विम्याची नुकसान भरपाई मिळत नाही. नोकरभरतीसाठी हजार हजार रुपये शुल्क आकारूनही होत असलेली पेपरफुटी ही तर नेहमीचीच बाब झाली आहे. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर आणि बेरोजगारांवर अन्याय होत आहे. राज्यात नवीन कोणताही प्रकल्प आणून युवांसाठी रोजगार निर्मिती केली जात नाहीच पण महाराष्ट्राच्या वाट्याचे हक्काचे प्रकल्प इतर राज्यांत आणि त्यातही प्रामुख्याने गुजरातमध्ये नेले जात आहेत. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही दिवसेंदिवस बिकट बनत चालला आहे. अनेक दिवस कडाक्याच्या थंडीत आंदोलन करुनही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या आंदोलनाकडं सरकार ढुंकूनही बघत नाही. दरवर्षी लाखो युवा शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत, पण त्यांच्या हाताला काम मिळत नाही.
युवा हा आपल्या देशाचा कणा आणि भविष्य असून एकूण लोकसंख्येमध्ये त्याचं प्रमाण ६० टक्के आहे. तरीही त्यांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने राज्यातील युवा वर्ग अस्वस्थ आहेत. राज्यात ३२ लाख युवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून परीक्षा फी, पेपरफुटी, रखडलेली अडीच लाख रिक्त पदांची भरती हे प्रश्नही सुटलेले नाहीत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणारा खर्च सरकारकडून दरवर्षी कमी-कमी केला जातोय. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वाच्या ताटात भाकर देण्याचं काम देशाचा पोशिंदा असलेला बळीराजा करतोय, पण त्याच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही.
आमदार रोहित दादा पवार यांनी पुणे ते नागपूर अशी ८०० कि.मी. हून अधिक लांबची युवा संघर्ष यात्रा काढून राज्यातील या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं कंत्राटी भरतीचा जी.आर. रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि समूह शाळा योजनेची अंमलबजावणी करण्यापासून सरकारला माघार घ्यावी लागली. परंतु अद्यापही अनेक प्रश्न शिल्लक आहेत पण सरकार हे प्रश्न सोडवण्यासाठी काहीही हालचाल करत नाही. असे अनेक प्रश्न आणि अडचणी लोकांना भेडसावत असूनही त्या सोडवण्या ऐवजी सरकार जातीयवाद, धार्मिक संघर्ष आणि असेच इतर अनावश्यक मुद्दे पुढं आणून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचं काम करत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्त्वाला तडा जातोच पण राज्याच्या प्रगतीलाही खीळ बसत आहे आणि त्यात नुकसान मात्र सामान्य माणसाचंच होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही पुढील प्रश्नांकडे आपलं लक्ष वेधत आहोत. हे प्रश्न सर्वसामान्यांशी निगडीत असल्याने सरकारच्या माध्यमातून ते तातडीने सोडवण्यासाठी सरकारपर्यंत पोचवून सामान्य लोकांना दिलासा द्यावा,
यातील काही मागण्या या तात्काळ पूर्ण करणे शक्य असून काही मागण्यांबाबत मात्र बैठका घेऊन आणि पाठपुरावा करून पुढील काही दिवसात सोडवता येणार आहेत.
1) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शेतक-यांना तात्काळ मदत देण्यात यावी. दुष्काळ संबंधित दोन्ही शासन निर्णयातील तफावत दूर करून सर्वच महसूल मंडळांना NDRF
निकषांच्या चार पट मदत देण्यात यावी.
2) मा.आ.जयंतरावजी पाटील साहेब व मा. आ. रोहितदादा पवार साहेब यांच्यावर झालेली इ.डी.ची चौकशी रद्द करण्यात यावी.
3) राज्यात रिक्त असलेली सर्व विभागांच्या सर्व संवर्गाची अडीच लाख रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत.
4) छुप्या पद्धतीने सुरु असलेली कंत्राटी भरती तात्काळ बंद करावी.
5) अवाजवी परीक्षा शुल्क कमी करण्यात यावे व या आधी घेण्यात आलेले अवाजवी शुल्क
परत करावे.
6) ६० हजार रिक्त पदांची शिक्षक भरती, रखडलेल्या सर्व प्राध्यापक पदांची भरती यांसारख्या रखडलेल्या भरती प्रक्रिया तात्काळ सुरु कराव्यात. तसेच प्रलंबित असलेल्या सर्वनियुक्त्या तात्काळ देण्यात याव्यात.
7) राज्यात पेपरफुटी संदर्भात राजस्थान, उत्तराखंडच्या धर्तीवर कडक कायदा करावा.
8) दत्तक शाळा योजना रद्द करावी.
9) महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात शक्ती कायद्याची अंबलबजावणी करण्यात यावी.
10) नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी सक्षम धोरण आणावे.
11) विविध समाजातील विद्यार्थ्यांसाठीची आणि महिलांसाठीची रखडलेली सर्व शासकीय वसतिगृहे तात्काळ सुरू करण्यात यावीत.
12) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज माफी करण्यात यावी.
13) खेळाडूंची रखडलेली थेट नियुक्ती देण्यात यावी.
14) मराठा समाजाच्या आरक्षणातील संभ्रम दूर करुन धनगर, मुस्लीम व लिंगायत या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्नही सोडवण्यासाठी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे वाढवण्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा आणि जातनिहाय जनगणना करण्यात यावी.
15) अंगणवाडी सेविका, आशा सेविका, समुदाय आरोग्य अधिकारी, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, संगणक परिचालक, महाराष्ट्र सुरक्षा बल, होमगार्ड अशा सर्व संघटनांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न तात्काळ सोडवावेत.
16) सारथी, बार्टी, महाज्योती, टी. आर.टी.आय. या संस्थाना प्रत्येकी १००० कोटी देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात यावे.
17) विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या शैक्षणिक शिष्यवृत्या त्वरित वितरीत करण्यात याव्यात.
18) कापूस, कांदा, तूर, सोयाबीन यासह अनेक पिकांना चांगला दर मिळत नसल्याने उत्पादन खर्च लक्षात घेऊन शेतकऱ्यांना मदत अनुदान देण्यात यावे.
19) खतांच्या लिंकिंगमुळे शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी योग्य धोरण आणावे.
20) प्रयोगशील शेतकरी प्रोत्साहन योजना राबवण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना नियमित व दिवसा वीज पुरवठा देण्यात यावा.
21) युवा पिढीचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी राज्यातील ड्रग्सचे रॅकेट पूर्णपणे नष्ट करण्यात यावे.
22) दुधाचे भाव पडले असून यातून दूध उत्पादकांचा खर्चही भरून येत नाही. त्यामुळे दुधाला भाव देण्यात यावा/ अनुदान देण्यात यावे.
23) आचार संहिता लागण्यापूर्वी सर्व अडीच लाख पदांसाठीची भरती प्रक्रिया सुरु करावी.
24) उदगीर नगर परिषदेने वाढवलेली पाणीपट्टी व घरपट्टी कमी करण्यात यावी.
25) वलांडी येथील लहान मुलीवर अत्याचार केलेल्या आरोपीची फास्ट ट्रक कोर्टात केस चालवून आरोपीला तात्काळ शिक्षा करण्यात यावी.
26) उदगीर येथील सामान्य रूग्णालयात रूग्णांची होणारी हेळसांड त्वरीत थांबवावी व डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांचा स्टॉफ उपलब्ध करून देण्यात यावा.
वरील मागण्यांचे निवेदन आज दिनांक १ फेब्रुवारी 2024 रोजी मे. तहसिलदार साहेब उदगीर यांना देण्यात आले या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर साहेब, माजी आमदार शिवराज तोडचिरकर साहेब, तालुकाअध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी मुळे सर, प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर साहेब, अल्पसंख्याक प्रदेश सरचिटणीस अजिम दायमी साहेब, शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर साहेब, जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर पाटील साहेब, अँड. प्रभाकर काळे साहेब, युवक शहराध्यक्ष अजय शेटकार, जेष्ठ नेते धनाप्पा बनसोडे, शहर उपाध्यक्ष शंकर मुक्कावर सावकार, आझहर मोमीन, बाउद्दीन जळकोटे, साजिद खुरेशी, प्रेम तोगरे, सागर सोनाळे, माधव उदगीरकर, संतोष जाधव, लक्ष्मण सोनावळे, सुशांत बनसोडे, अखिब शेख, नरसिंह कांबळे, नामदेव भोसले, वौजनाथ गायकवाड, मनोज नावंदे, आमरदीप बिरादार, कमलाकर भंडे, अमोल मुळे, धोडींबा पुदाले, मोरे चक्रधर, शिवमूर्ती उमरगेकर, सतीश वाघमारे, महिंद्रा नेत्रगावकर व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

जाहिरात