उदगिरात महाविकास आघाडीचा विविध मागण्यासाठी शासनाविरुद्ध १५ फेब्रुवारीला विराट मोर्चा..
उदगिर शहरात उदगीर व जळकोट महाविकास आघाडीच्या वतीने विविध मागण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या जुलमी कारभाराविरुध्द १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत "भव्य विराट मोर्चा" काढणार असल्याची माहिती रविवारी (११ फेब्रुवारी) सायंकाळी ६ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत उदगीर महाविकास आघाडीच्या वतीने देण्यात आली.
मोर्चातील प्रमुख मागण्या जळकोट व उदगीर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ अनुदान मंजुर करावे. शुन्य टक्के व्याजदराने वाढीव पिक कर्ज देऊन मोडकळीस आलेल्या शेतक-याला आधार द्यावा. यासह विद्यार्थी व बेरोजगार व कर्मचारी मागासवर्गीय, आदिवासी व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी १००% शिष्यवृत्ती जाहीर करावी. खाजगी विद्यापिठ विधेयक रद्द करावे. व तसेच महीलांच्या संदर्भीत होत असलेले गुन्हे दिवसागणिक वाढत आहेत. याला पायबंद घालण्यासाठी कठोर उपाययोजनाची अमलबजावनी करावी. घरगुती गॅस प्रति सीलेन्डर ५०० रुपये प्रमाणे द्यावे. निवडणूक आयोगाने येणाऱ्या निवडणुका ह्या E.V.M. मशीन बंद करून बायलेट पेपरवर घ्याव्यात. व तसेच स्थानिक मुद्दे, नगरपरिषद उदगीरच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी. महसुल विभागात गुंठेवारीच्या नावाखाली होणारी लुट बंद करावी. उदगीर तहसिल, आरोग्य विभागात असलेले प्रति नियुक्ती अधिकाऱ्यांच्या नियुक्तया तात्काळ रद्द कराव्यात. न. प. उदगीर ने आकारलेली जुलमी पानी पट्टी व घरपट्टी वाढीव कर दर वाढ तात्काळ रद्द करावा. उदगीर येशील फुले नगर, मुसा नगर, संजय नगर, गांधीनगर, अशोक नगर व इतर सर्व कबाले अधिकृत करून त्यांना घरकुल द्यावे. महावितरण मार्फत अॅवरेज लाईट बिल देणे बंद करावे. आशा सेवीका व अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन वाढवण्यात यावे. उदगीर येथील जिल्हा उपरुग्णालयात एम आर आय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी व अन्य रक्त तपासन्या मोफत उपलब्ध करण्यात याव्यात.
उदगीर जिल्हा निर्माण करण्यात यावा. उदगीर येथील शासकीय दुध योजना तात्काळ एन.डी.बी.डी. मार्फत सुरू करावे. ते खाजगी कंपनीला देण्यात येऊ नये. यासह एकुण ३२ मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने भव्य विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. असे पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते बस्वराज पाटील नागराळकर, प्रा. शिवाजीराव मुळे,कल्याण पाटील, कृषी सभापती शिवाजी हुडे, उषा कांबळे, प्रिती भोसले, अॅड. प्रभाकर काळे, मधुकरराव एकुरकेकर, रंगा राचुरे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत टेंगेटोल,आशिष पाटील राजूरकर,अशिष शिंदे,अजीम दायमी, यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments