पत्नीस शिवीगाळ का करता म्हणून विचारणा केली असता,अंगठ्याचा घेतला चावा
देवणी:तालुक्यातील भोपणी येथे पत्नीस व सुनेला शिवीगाळ का करतोस म्हणून मारहाण केल्याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेली माहिती अशी की भोपणी येथे पत्नीस व सुनेला विनाकारण शिवीगाळ का करतोस म्हणून फिर्यादीने विचारणा केली असता आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून लथाबुक्याने मारहाण करून दगडाने उजव्या कोपरावर डावे अंगठ्याला चावा घेवून जखमी केले व तू जर माझ्या नादाला लागलास तर तुला जीवे मारू अशी धमकी दिली, अशी फिर्याद कुमार गुणवंतराव बिरादार यांनी देवणी पोलीस ठाण्यात दिल्यावरून आरोपी मिलिंद भीमराव बिरादार यांच्यावर गुरंन ४४/२४ कलम ३२४ ३२३,५०४,५०६,भादवी प्रमाणे १० फेब्रुवारी रोज शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments