श्री.संत सेवालाल महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी होणार,सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचा निर्णय
उदगीर:बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री.संत सेवालाल महाराज यांची जयंती २२ फेब्रुवारी रोज गुरुवारी साजरी होणार असून सेवालाल महाराज जयंती कशी साजरी करण्यात यावी यासाठी शंकर माध्यमिक आश्रम शाळा येथे उदगीर व जळकोट तालुक्यातील बंजारा समाजाची बैठक ११ फेब्रुवारी रोज रविवारी घेण्यात आली,या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली त्याच बरोबर संत सेवालाल महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अध्यक्षपदी म्हणून सिंघम मोतीराम जाधव यांची तर उपाध्यक्षपदी अनिल मोतीराम राठोड, विलास भारतराव राठोड यांची निवड करण्यात आली,संत सेवालाल महाराज यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने बंजारा समाजाने आपली संस्कृती रूढी परंपरा जपत उदगीर शहरात भव्य मिरवणूक काढून सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला, या बैठकीत उदगीर व जळकोट येथील बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी सभापती बापूसाहेब राठोड,माजी सभापती रामराव राठोड,माजी सरपंच संजय पवार,सरपंच सुभाष मुन्ना राठोड,संजय राठोड,सुभाष पवार,विनायक आडे,श्याम राठोड, लक्ष्मण चव्हाण,संजय नाईक,सुग्रीव पवार,भगवान आडे,संदीप आडे,अनिल चव्हाण, सुनील चव्हाण यांच्यासह बंजारा समाजाचे तरुण उपस्थित होते.
0 Comments