छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शांततेत साजरी करावी, पोलीस निरीक्षक करण सोनकवडे
उदगीर:शहरात साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शांततेत साजरी करावी,शहरात मोटारसायकल रॅली काढताना मोटारसायकलचा आवाज मर्यादेत ठेवावा,शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घेवून मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी असे आव्हान पोलीस निरीक्षक करण सोनकवडे यांनी शहर पोलीस ठाण्यात १० फेब्रुवारी रोज शनिवारी सांयकाळी आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत बोलताना केले,यावेळी सार्वजनिक शिव जयंतीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील,मदन पाटील, दत्ता पाटील, नवनाथ गायकवाड, सतीश पाटील मानकीकर,श्याम पिंपरे,अजिंक्य पाटील,बंडू पाटील,बाबासाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
0 Comments