Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

जय हिंद पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थीनीना स्वसंरक्षण प्रशिक्षणास सुरुवात

जय हिंद पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थीनीना स्वसंरक्षण प्रशिक्षणास सुरुवात

उदगीर - अत्याचाराच्या विरोधात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सज्ज करण्यासाठी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर च्या २६ व्या वर्धापनदिन व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - मा. प्राचार्य डॉ. सुधिर जगताप यांच्या वाढदिवसा निमित्त क्रीडा विभाग जय हिंद पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज उदगीरच्या विद्यार्थीनीना स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराची सुरूवात केली. त्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनीना १४ दिवसाचे  प्रशिक्षण देण्यात येत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष - मा. डॉ. सुधिर जगताप यांनी सांगितले की, ‘तायक्वांदो’ आणि ‘कराटे’ यांसारख्या  साधे आणि सोपे स्वसंरक्षण तंत्र विद्यार्थ्यांनीना शिकवण्यात येईल. अगदी अल्प काळात सर्व वयोगटातील विद्यार्थीनीना शिकणे सोपे जावे अशा प्रकारे ते तयार करण्यात आले आहे. बस, रेल्वे तसेच लिफ्ट, एटीएम आणि इतर सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थीनीना दररोज लैंगिक छळ, अत्याचार, हल्ले यांना सामोरे जावे लागते. असा प्रकार झाल्यास विद्यार्थीनीना स्वत:चे संरक्षण करता यावे यासाठी हे तंत्र उपयुक्त ठरेल. ऑसिड हल्ला, साखळी ओढणे, कौटुंबिक हिंसाचार आणि इतर लैंगिक छळ प्रकरणात लढण्यासाठीही हे तंत्र उपयुक्त ठरेल.  प्रस्तावित प्रशिक्षणात ४० तासांचा अभ्यासक्रम असेल. त्यात संरक्षण तंत्रांची माहिती दिली जाईल त्याशिवाय विद्यार्थीनी मध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि त्यांच्यात विद्यार्थीनीशी संबंधित कायद्यांबाबत जागृती निर्माण व्हावी यासाठी व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण दिले जाईल तसेच मानसशास्त्रीय टिप्सही दिल्या जातील. विद्यार्थीनीना स्वसंरक्षण तंत्र प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आले असल्याने तसेच त्याबाबत जागरूकता मोहीम सुरू झाल्याने  विद्यार्थीनीना अत्याचारांच्या घटनांना आळा बसेल, अशी अपेक्षा डॉ. सुधिर जगताप यांनी व्यक्त केली.
 ०७ फेब्रुवारीपासून क्रीडा  विभागाने स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर (निर्भय कन्या अभियान) हा उपक्रम  जय हिंद पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज उदगीर मध्यील विद्यार्थीनीना  प्रशिक्षण-जागृती कार्यक्रम तयार केला आहे. ९५७ विद्यार्थीनीना  त्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे असे क्रीडा शिक्षक तथा राष्ट्रीय पंच - संदीप स. पवार यांनी सांगितले,
या प्रसंगी मनुष्य बळ व्यवस्थापिका ज्योती स्वामी, जय हिंद पब्लिक स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज उदगीर चे प्राचार्य संजय हट्टे, नॉबेट समन्वयक मनोरमा शास्त्री, उपप्राचार्य सतिश वाघमारे, फार्मसी कॉलेज उपप्राचार्य दिग्विजय केंद्रे, महेश कस्तुरे, पवन भालेराव, धोंडीबा शिंदे, गणेश शिंदे, सुशांत जाधव, सोमनाथ झेरकुंटे, उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments

जाहिरात