जीर्ण झालेली टपाल कार्यालयाची इमारत पाडून तात्काळ नवीन इमारत बांधा ; बहुजन विकास अभियान प्रमुख संजय कांबळे
उदगीर:चारी बाजूने विकास होत असलेल्या ऐतिहासिक उदगीर शहरातील टपाल कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असून सदरील इमारत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही .सदरील पोस्ट ऑफिस टपाल कार्यालयाच्या इमारतीला तडे जात असून नवीन इमारत बांधणे गरजेचे आहे. उदगीर शहरात अनेक कार्यालयाची नवीन इमारती बांधले जात असून टपाल कार्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे या कार्यालयामध्ये नेहमी नागरिकांची वर्दळ असते जीवित हानी होऊ नये याची खबरदारी म्हणून नवीन इमारत इमारत बांधणे गरजेचे आहे. पोस्ट ऑफिसच्या इमारतीची पडझड होत असून या ठिकाणी कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. म्हणून उदगीर शहरातील पोस्ट ऑफिस ची इमारत पाडून तात्काळ नवीन इमारत बांधण्यात यावी . टपाल कार्यालय ऐतिहासिक काळापासून पासून उदगीर शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन ही इमारत तातडीने पाडून तात्पुरती दुसऱ्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करून नवीन इमारत उदगीरकर यांच्या सेवेत बांधावी या मागणीसाठी बहुजन विकास करण्याच्या वतीने टपाल कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत घोषणाबाजी करण्यात आली. प्रशासनाला मागण्याची निवेदन देण्यात आले आंदोलन स्थळी येऊन प्रशासनाने निवेदन स्वीकारले यावेळी अभियान प्रमुख संजयकुमार, एडवोकेट यम चव्हाण, संजय राठोड ,लक्ष्मण आडे अनिल भोसले ,गोरख वाघमारे दिलीप वासरे, आकाश पाटील, निजामुद्दीन शेख, बब्रुवान वाघमारे, जावेद शेख रवी डोंगरे इत्यादी अभियानाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments