खुनातील आरोपींला उदगीर सत्र न्यायालयाने सुनावली जन्म ठेपेची शिक्षा
उदगीर:समता नगर येथे ११.ऑगस्ट २०१९ रोजी संद्याकाळी ७ वाजता मयत संभाजी शिवाजी यादगीरे यांनी आरोपी नामे विजयकुमार नारायण पांचाळ यास आमच्या घरासमोर भांडण करु नकोस असे म्हंटल्याने व त्याच दिवशी सकाळी आरोपी करत असलेले भांडण सोडविल्याने 'सकाळी लई बोलला होतास, पिलेले म्हणतोस का' असे म्हणून मयताचे कॉलर धरुन घरासमोरील दगडावर आपटून तुला खतम केल्याशिवाय सोडणार नाही असे म्हणून छातीवर बसून मयताचा खुन केला. अशा स्वरुपाची तक्रार मयताची पत्नी यांनी उदगीर ग्रा. पोलीस स्टेशन येथे दिल्याने आरोपीविरुध्द गुन्हा र. नं. ३०४/२०१९ कलम ३०२ भादवि प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला व सदरील गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी.व्ही. अन्सापुरे यांच्याकडे देण्यात आला. सदरील गुन्हयाचा संपूर्ण तपास त्यांनी केला त्यानंतर सदरील अधिका-याची बदली झाल्याने दोषारोपपत्र हे पोलीस उपनिरीक्षक डी.डी. सिंघनकर यांनी दाखल केले, त्यानंतर सदरचे प्रकरण हे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उदगीर यांनी सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करुन सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले. सत्र खटला क्रमांक.८६/२०१९ , सदरील सत्र खटल्याची सुनावणी पिठासन अधिकारी सत्र न्यायाधीश पी.डी. सुभेदार यांच्या न्यायदालनात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सरकार पक्षाने एकुण ७ साक्षिदारांची साक्ष नोंदविली. तसेच सदरील सत्र खटल्यातील शव विच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी हे मयत झाले असल्याकारणाने त्यांच्यासोबत काम केलेले तत्सम वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष नोंदवून मयताचे मृत्यूचे कारण सरकार पक्षाच्या वतीने सिध्द करण्यात आले. वरील सर्व साक्षिदारांनी सरकार पक्षाला सहकार्य केल्याने तसेच संचिकेतील कागदपत्रांच्या अनुषंगाने केलेला सविस्तर असा युक्तीवाद व उपलब्ध पुराव्या आधारे सत्र न्यायालय उदगीर येथील पिठासन अधिकारी सत्र न्यायाधीश पी.डी. सुभेदार यांनी २७.०२.२०२४ रोजी आरोपीला कलम ३०२ भादवि प्रमाणे आरोपीस सश्रम जन्मठेपेची शिक्षा व १,०००/- रुपये दंड ठोठावला. सदरील प्रकरणात फिर्यादी कडून अॅड. श्याम एस. कांबळे यांनी काम पाहिले
0 Comments