भाजपाकडून राहुल गांधीचा पुतळा जाळून केला निषेध
उदगीर:काँग्रेसचे नेते राहुल गांधी यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत ते तेली समाज ओबीसी मध्ये नाही असे वक्तव्य करून तेली समाजाचे अवमान केले, आणि सखल ओबीसी समाजाचा सुद्धा संतापजनक अवमान केला आहे. या वक्तव्याचा निषेध म्हणून उदगीर तालुका भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे राहुल गांधीचा पुतळा जाळून निषेध आंदोलन केले.
यावेळी भाजपा शहरध्यक्ष मनोज दादा पुदाले,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल निडवदे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष उत्तराबाई कलबुर्गे,महिला मोर्चा शहरध्यक्ष शिल्पा इंगळे, युवा मोर्चा शहरध्यक्ष रामेश्वर चांडेश्वरे, महिला मोर्चा स्वातीताई वाट्टमवार, अनिता नेमताबादे,युवा प्रसिद्धीप्रमुख प्रसाद नाईकवाडे, जिल्हाउपाध्यक्ष परमेश्वर बिरादार, जिल्हासचिव मन्मथ भुसारे, युवा मोर्चा शहर सरचिटणीस प्रितम विरशेटे , सचिव श्रीपाद अंहकारी,उपाध्यक्ष रामेश्वर कोटलवार, उपाध्यक्ष कृष्णा वाडकर, सचिव मुकुंद तेलंग,ऋषीं घाटे, सोमनाथ कुंभार, अभिनेत चिकटवार, ऋषिकेश जगळपुरे, विध्यार्थी प्रमुख मंगेश येरकुंटे, सचिव विशाल काळे, पवार धर्मापाल, अभिजित थोरे, संकेत पोले, अमर दावतपुरे, पांढरे प्रसाद आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments