कुमठा येथे एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी सोन्याच्या दागिन्यासह सात लाखांचा ऐवज लंपास
उदगीर: तालुक्यातील कुमठा येथे एकाच रात्री चोरट्याने दोन ठिकाणी घरफोडी करून सात लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना ७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी की कुमठा येथील शेतकरी संतोष माधवराव केंद्रे यांच्या घराचे ७ फेब्रुवारी रोजी रात्री चोरट्याने घराच्या दाराचे कुलूप कोंडा तोडून घरात प्रवेश केला.घरात असलेल्या पत्राच्या पेटीत ठेवलेले दोन लाख चार हजारांचे सोन्याचे दागिने व नगदी रोख रक्कम वीस हजार रुपये चोरून घेवून गेले,तसेच फिर्यादीच्या भावकितील दत्ता शिवाजी केंद्रे यांच्याही घराचा कुलूप तोडून चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले चार लाख आठेचाळी हजारांचे सोने व तीस हजार रुपये रोख रक्कम असे एकूण चार लाख अष्टयाहत्तर हजार रुपये असे दोन्ही मिळून सात लाख दोन हजार सहाशे रुपयांचा ऐवज कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केला, संतोष माधवराव केंद्रे वय ३८ वर्ष राहणार कुमठा खुर्द यांच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुरंन८५/२४ कलम ४५७,३८० भादवी प्रमाणे ८ फेब्रुवारी रोज गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले हे करीत आहेत.
0 Comments