उदगीर येथील पोस्ट ऑफिस नुतणीकरणासाठी ३७.५८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर.खा. सुधाकर तुकाराम श्रृंगारे.
उदगीर शहरातील पोस्ट कार्यालयाची नविन इमारतची उभारणी करावी अशी उदगीरकरांची बरेच दिवसापासूनची मागणी होती,उदगीर करांची मागणी लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मा. देवुसिंहजी चौहान यांना निवेदन देऊन लवकरात लवकर ही पोस्ट कार्यालये नव्याने बांधण्यासाठी मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती, खासदार सुधाकर शृंगारे यांची मागणी दूरसंचार मंत्र्यांनी मान्य करून निधी पोस्ट कार्यालयाची इमारत बांधकामासाठी ३७,५८,०३१ रुपयांचा निधी मंजूर करून दिला, उदगीर शहरात १९७६ मध्ये बांधलेल्या जुन्या पोस्ट ऑफिसच्या इमारतीचे नुतनिकरणासाठी मान्यता मिळाली असून नुकतेच त्या बाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत, उदगीरांची अनेक वर्षापासुनची मागणी मान्य झाली आहे.


0 Comments