कंधार वेस येथे शॉर्ट सर्किटमुळे डीपी जळून खाक
उदगीर:शहरातील कंधार वेस येथे शॉर्ट सर्किटमुळे डीपी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे, सूत्रांनी दिलेली माहिती अशी की कंधार वेस वसंत फुलारी यांच्या घरासमोर असलेल्या डीपीला १४ मार्च रोज गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आग लागली,या आगीत डीपी मधील सर्व मिटर जळून खाक झाले आहेत,स्थानिक नागरिकांनी डीपीला लागलेली आग विझवली या घटनेची माहिती तात्काळ महावितरण कर्मचाऱ्यांना व नगरपरिषदेच्या देण्यात आली घटनेची माहिती मिळताच परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आगी मुळे कोणतेही नुकसान झालेला नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे,
0 Comments