मराठा समाज आरक्षण सर्वेचा मानधन अडलय कुठ,३१ मार्च पूर्वी तरी मिळेल का?
उदगीर:प्रतिनिधी
उदगीर: राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यातील मराठा समाज व राखीव प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या,उदगीर तालुक्यात उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व तत्कालीन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सर्वेक्षण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते, आदेशाप्रमाणे कर्मचाऱ्यांनी २३ ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत तातडीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून प्रशासनास अवाहल सादर केला,कर्मचाऱ्यांना दोन ते तीन दिवसांत सर्वेक्षणाचे मानधन खात्यावर जमा करण्यात येणार आहेत म्हणून कर्मचाऱ्यांचे बँक खाते मागवून घेतले,परंतु उदगीरचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांची बदली झाली, उदगीरचे नवे तहसीलदार म्हणून राम बोरगावकर हे रुजू झाले,उदगीर तालुक्यात करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण सर्वेचा कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनाला मांजर आडवं गेलंय का? की माशी शिंकली,अशी चर्चा कर्मचाऱ्यांतून होताना दिसून येत आहे. सर्वेक्षणासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिली असतानाही आजपर्यंत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर मानधन जमा न झाल्याने चर्चेला पेव फुटले आहे,उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे यांनी ३१ मार्च पूर्वी सर्वेक्षणाचे मानधन कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश संबंधिताना देतील का हे पहावे लागणार आहे.
0 Comments