इंस्टाग्रामवर धारधार हत्यार दाखवून रील बनवणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी केली कारवाई,स्टेटस ठेवणे आले अंगलट
उदगीर:इंस्टाग्रामवर धारधार हत्यारांची रील बनवणाऱ्या तरुणांवर डीबीच्या पोलीस पथकाने कारवाई करून गुन्हे दाखल केले आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंढे,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे,उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी शोसल मीडियावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत,पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पशुवैद्यकीय महाविद्यालय जवळ अमोल सुधाकर बिरादार राहणार वलांडी ता.देवणी यांनी इंस्टाग्रामवर घातक धारधार हत्यार वापरून लोकांमध्ये दहशत निर्माण होईल अशा पध्दतीने रील बनवणाऱ्या युवकांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून चाकू जप्त करण्यात आला आहे.त्याच बरोबर गोपाळ नगर येथे राजकुमार ज्ञानोबा आलावाड यांनी इंस्टाग्रामवर दोन तलवारी व एक कोयता ठेवून समाजात दहशत निर्माण करणाऱ्या या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन घातक हत्यार अधिनियम कलम ४,२५ व सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून हत्यार जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले,पोलीस उपनिरीक्षक कुलकर्णी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे,पोलीस हेडकॉन्स्टेबल राम बनसोडे, पोलीस नाईक नाना शिंदे,पोलीस अंमलदार नामदेव चेरले,पोलीस हेडकॉन्स्टेबल बिरादार, पोलीस नाईक गेडाम,राहुल गायकवाड यांच्या पथकाने केली.सोशल मीडियावर घातक रील अथवा फोटो ठेवून समाजात भीती निर्माण करणाऱ्यावर कडक कारवाई करणार,उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले.
0 Comments