हातात तलवार घेवून युवकांने शेळगावात माजवली दहशत,तरुणावर गुन्हा दाखल
उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीतील शेळगाव येथे तरुणांनी हातात तलवार घेवून गावात दहशत निर्माण केल्याप्रकरणी वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, वाढवणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,शेळगाव ता.चाकूर येथे आरोपी इरफान मुनुसाब अत्तार वय ३६ वर्ष याने लोकांमध्ये दहशत पसरविण्याच्या उद्देशाने विनापरवाना बेकायदेशीर धारदार लोखंडी तलवार स्वतः च्या कब्जात बाळगून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले,पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव रंगनाथ सारूळे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी इरफान मुनुसाब अत्तार यांच्यावर वाढवणा पोलीस ठाण्यात गुरंन ७३/२४ कलम ४,२५ शस्त्र अधिनियम सह कलम १३५ प्रमाणे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भीमराव गायकवाड यांच्या आदेशाने पोलीस हेडकॉन्स्टेबल दळवे यांच्याकडे देण्यात आला आहे.
0 Comments