Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

किंग मटका बहाद्दरावर कारवाई होणार का? उदगीर बनला जुगारांचा अड्डा,अनेक कुटुंब उघड्यावर

किंग मटका बहाद्दरावर कारवाई होणार का? उदगीर बनला जुगारांचा अड्डा,अनेक कुटुंब उघड्यावर

उदगीर/प्रतिनिधी:अविनाश गायकवाड
उदगीर:शहरातील मटका जुगारांचे किंग डॉन म्हणजे सिद्धेश्वर ममदापुरे,व अजय दामुवाले यांनी स्वतः च्या आर्थिक फायद्यासाठी उदगीर शहरात  खुलेआम मटका जुगार सुरू केला असून मटका जुगारातून लाखों करडो रुपयांचा मलिदा लाटत  उदगीर वासीयांचे संसार उध्वस्त करीत आहेत, उदगीर शहरात खुलेआम मटका जुगार सुरू करून स्थानिक पोलिसांना लक्ष्मी दान देऊन अनेकांचे कुटुंब उध्वस्त केले आहे, पोलीस प्रशासन आमचे काहीच वाकडे करू शकत नाही आम्ही पोलिसांना हप्ते देऊन धंदा चालू केला आहे असे बोलत आहेत, मटका जुगरांचा हप्ता लातूर जिल्ह्याचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून संपूर्ण देशात ओळख असलेले पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांच्याकडेही जातोय का? अशी चर्चा सुरु आहे, जुगार मटक्याचे हप्ते स्थानिक पोलीस प्रशासन आपल्या खिशात घालून यांना श्रेय देत असल्याचे उघड झाले आहे, या दोघा मटका किंग बहाद्दरानी स्थानिक पोलीस प्रशासनास हप्ते देत असल्याचे जगजाहीर असले तरी  लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांना या गोष्टीची माहिती आहे किंवा नाही अशीही चर्चा उदगीर शहरात जोरात सुरू आहे,या दोघा मटका किंग बहाद्दरानी हजारो लोकांना चुना लावत अनेकांचा कुटुंब उध्वस्त करीत आहेत, मात्र स्थानिक पोलीस प्रशासनानी मूग गिळून गप्प बसले आहेत, या गोष्टीकडे लातूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंढे यांनी लक्ष घालून या मटका किंग बहाद्दर यांच्यावर कारवाई करून जुगाराचे अड्डे उध्वस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात